
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. सिम कार्ड, जीएसटी, गॅस सिलिंडरच्या किमती, ते वाहनांच्या किमतीपर्यंत मोठे बदल होणार आहेत. बाबतही एक मोठे अपडेट समोर आले आहे. 1 जानेवारीपासून एकूण 8 गोष्टींमध्ये बदल होणार आहेत.
1 जानेवारीपासून हे नियम बदलणार
यूपीआय होणार डिअॅक्टिव्ह
1 जानेवारीपासून वर्षभर वापर न केलेल्यांचे यूपीआय अकाऊंट बंद करण्यात येणार आहेत. ज्या अकाऊंटने गेल्या वर्षभरात कुठलीही देवाण घेवाण झालेली नाही त्यांना बंद करण्यात येणार आहे. बॅंका, पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखे थर्ड पार्टी अॅप्स देखील 1 जानेवारीपासून यूपीआय आयडी डिअॅक्टिव्ह करण्यात येतील.
सिम कार्डाचे नियम बदलले
1 जानेवारीपासून सिम घेण्यासाठी डिजिटल केव्हायसी करणे गरजेचे आहे. कारण दूरसंचार विभागाने पेपरलेस काम करण्यासाठी आता डिजिटल केव्हायसीबंद केले आहे.
आयटीआर फाइलिंग
1 जानेवारीपासून आयटीआर फाइलिंगसाठी दंड भरावा लागेल. 31 डिसेंबर ही विलंबित आयटीआर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून दंड आकारण्यात येणार आहे.
डीमॅट अकाऊंट नॉमिनी
जर म्युच्युअल फंडात गुंतवणुक करता किंवा ट्रेडिंग करत असाल तर त्याला वारसदार जोडणे गरजेचे आहे. सेबीने त्याची डेडलाईड वाढवून 30जून 2024 केली आहे.
पार्सल पाठवणे महागणार
नव्या वर्षापासून पार्सल पाठवणे महागडे होऊ शकते. ओव्हरसीज लॉजिस्टिक ब्रँड ब्लू डार्टने पार्सल पाठवण्याच्या दरात 7 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
गॅस सिलेंड़रचे भाव
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचे भाव ठरवले जातात. अशात वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत मोठी घोषणा होऊ शकते.
गाड्या घेणं होणार महाग
1 जानेवारीपासून देशात कार कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लग्झरी गाड्यांची नावेही या लिस्टमध्ये आहेत.
पासपोर्ट व्हिजा नियम
2024 पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच तोपर्यंत कोणत्याही देशातील विद्यार्थी वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत.




























































