आगरी साहित्य विकास मंडळाचे जानेवारीत साहित्य संमेलन

आगरी साहित्य विकास मंडळाचे 18 वे अखिल आगरी साहित्य संमेलन भेंडखळ,ता. उरण जि. रायगड येथे 18 व 19 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात “आगोट”हा साहित्य संमेलन विशेषांक (स्मरणिका) प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यासाठी आगरी साहित्यिकांना आपले साहित्य (कथा ,कविता,लेख) पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर साहित्य 25 डिसेंबर 2019 पर्यंत पोहचेल अशा प्रकारे पाठवायचे आहे. त्यानंतर आलेल्या साहित्याचा विचार केला जाणार नाही. यथा योग्य साहित्याचा समावेश विशेषांकात केला जाईल असे आवाहन आगरी साहित्य विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोहन भोईर यांनी केले आहे.

साहित्य पाठविण्याचा पत्ता:

राजेंद्र नाईक, ब्लॉक नं. बी १०५, दुसरा मजला, कुलसुम भाईजी अपार्टमेंट, वाणी आळी, उरण,पो. ता.उरण, जि.रायगड पी. नं.४००७०२(भ्र. क्र.७२०८२३२६७१)

आपली प्रतिक्रिया द्या