
न्हावाशेवा, राजकुमार भगत
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवुत्ती कोल्हाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या उरण पोलिसांनी गावठी दारू विक्री विरोधात जोरदार धाडसत्र सुरू केले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोपटे, चिरनेर, चिर्ले येथे छापे टाकून अनेक लिटर गावठी दारू जप्त केली. काही दिवसांपूर्वी त्यानी करंजा गावातील गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले होते. खोपटे गावातील धनेश म्हात्रे आणि चिरनेर गावातील एका महिलेला गावठी दारू विक्री प्रकरणी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक एस.जी. काठे, हवालदार कराळे, राठोड यांनी या कारवाईत भाग घेतला होता. गावठी दारू विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.































































