कोळ्याच्या भितीने महिलेने घेतली धावत्या कारमधून उडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरीकेतील जॉर्जियामध्ये एक विचीत्र घटना घडली आहे. एका महिलेने कोळ्याच्या भितीने धावत्या कारमधून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती कार नदीत जाऊन पडली आणि महिलेचा थोडक्यात जीव वाचला.

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात ही घटना घडली आहे. ही महिला तिची कार नदीकिनारी पार्क करत असताना अचानक एक कोळी तिच्या मांडीवर पडला. कोळी दिसताच ती जोरात किंचाळली आणि लगेच सीट बेल्ट काढून गाडीतून उडी मारली. तिने जेव्हा असे केले त्यावेळी गाडी रिव्हर्समध्ये होती. ती महिला खूप घाबरली होती, ती गाडीपासून दूर गेली आणि मागून येणाऱ्या कारला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे तिची कार आणि बोट दोन्ही डोळ्यासमोर इटावा नदीत बुडाले.

जॉर्जियाच्या राज्य पेट्रोलिंग पथकाने सांगितले की, त्यांना महिलेने या घटनेची माहिती दिली होती. आता टीम या 164 मैल लांब नदीच्या काठावर पोहोचली. मात्र पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार आणि बोट दोन्ही नदीत पूर्णपणे बुडाले होते. जॉर्जिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कार काही सेकंदातच पाण्याखाली गेली. नदीत काही अंतरावर असलेल्या बोटीचा वापर करून कार शोधण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र यश आले नाही.