
विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. हल्ली मोबाईल प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात दिसतात, मात्र या साधनांचा वापर जेवढा चांगला आहे तेवढाच तो धोकादायकही आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर केवळ विधायक कामासाठीच विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दापोली येथे आयोजित 50 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. हायस्कूल दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने 50वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दापोली शहरातील अल्फेड गॅडने हायस्कूल दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाला दापोली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीराम मांजलेकर, रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, मंडणगडचे गट शिक्षणाधिकारी सचिन गुजर, मुख्य परीक्षक प्रा. कैलास गांधी, खेडचे गटशिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिक्षणाधिकारी सुर्वणा सावंत म्हणाल्या की, 50वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हे दापोलीच्या पवित्र भूमीत आपण घेत आहोत. ही पवित्र भूमी असून या भूमीने देशाला अनेक नररत्न दिलेले आहेत. ज्या वास्तूच्या आवारात विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे त्या ए.जी. हायस्कूलनेही अनेकाअनेक थोर विद्यार्थी घडवलेले आहेत. आताच्या या आधुनिक युगात आपण मोठ्याा प्रमाणात स्टील, जर्मन इत्यादी आधुनिक भांडी वापरत आहोत, मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये जाणवणार आहेत म्हणून आपण मातीची, तांब्याची आणि कास्यच्या भांड्याकडे खासकरून महिला वर्गाने वळले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दापोली एज्युकेशन संस्थेचे निलेश जालगावकर, सौरभ बोडस, रविंद्र कालेकर, डॉ. प्रसाद करमरकर यांच्यासह विज्ञान मंडळ दापोली तालुका अध्यक्ष आकाराम महिंदर, सचिव राजेंद्रकुमार कुंभार आदीं सह शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, रामचंद्र सागडे, कल्याणी मुळे, सुनिल सावंत, ताजुद्दीन परकार, केंद्रप्रमुख शितल गिम्हवणेकर, धनंजय शिरसाट, गुलाबराव गावित, रविकिरण बुरटे, सुनिल येलवे, संतोष आयरे, सुनिल सकपाळ तसेच शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































