
कुकरचा असाही उपयोग
- जुन्या कुकरचे गास्केट काढून टाका आणि तो सर्व प्रकारचे केक, नान कटाईसाठी गॅस ओव्हनसारखा वापरता येतो.
- जुना कुकर ‘गॅस तंदूर’ म्हणून वापरा. त्यात सगळे तंदुरी प्रकार करू शकता.
- पाव भाजीसाठी बरेच पाव लोणी लावलेले एकदम गरम करता येतात फक्त 15ते 20 मिनिटे या जुन्या कुकरमध्ये ठेवून झाकण लावून गरम करता येतात.
- शेंगा भाजणे, राजगिऱ्याच्या लाह्या करणे, ज्वारीच्या लाह्या करणे इत्यादी कामे छान होतात. अशावेळी झाकणाचीही आवश्यकता नसते.
- घरात वापरत असलेला कुकर कधीही केक बनवण्यासाठी वापरू नका. यामुळे कुकर खराब होण्याची शक्यता असते.
- वेळप्रसंगी आंघोळीचे पाणीही गरम करता येते.
- शेंगा, बटाटे, रताळी, अरबी (अळकुडी) शिजवता येते. जेव्हा जास्त प्रमाणात बटाटे, शेंगा उकडायचे असतात तेव्हा हा कुकर उपयोगी पडतो.
- कुकरमध्ये आत चिकटवून नान/कुलचा करता येतो.






























































