
सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. काँग्रेसने सरचिटणीस प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवून प्रचाराचा नारळ पह्डला आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध शहरांचे नामकरण करत प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरापासून प्रियंका गांधी यांनी प्रतिज्ञा यात्रेतून जनतेशी संवाद साधणे सुरू केले आहे. महिला, कामगार, शेतकरी आणि युवा पिढीशी त्यांनी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्याशी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचवल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नेते, पदाधिकाऱयांशी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
20 लाख नोकऱया, मोफत वीज बिलाची केली घोषणा
उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास सुरुवातीला 20 लाख नोकऱया देणार असल्याची घोषणा केली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मार्टपह्न, पदवीधारक मुलींना स्कुटी आणि मोफत वीज बिलाची घोषणा त्यांनी केली. योगी यांच्या विरोधातील नाराजीचा फायदा घेण्याचे काँग्रेसने ठरवले आहे, मात्र अद्याप प्रियंका गांधी यांची उमेदवारी व मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसने ठरवलेला नाही.





























































