
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून दिल्लीचा अर्थसंकल्प लवकरात लवकर मांडण्यास सांगितलं आहे. हा अर्थसंकल्प 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सादर होणं अपेक्षित होतं. राष्ट्रपतींनी 19 फेब्रुवारी रोजी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. तरीही अद्याप दिल्लीचा अर्थसंकल्प सादर केला गेलेला नाही.
त्यामुळे सक्सेना यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून अर्थसंकल्प लवकरात लवकर मांडण्यास सांगितलं आहे. दिल्लीच्या जनतेला अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी तसंच करसवलतीसारख्या गोष्टींबाबत जाणून घेण्याचा हक्क असल्याचं सक्सेना यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी विधानसभेत उपराज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतरच त्याच्या पुढील मंजुरीसाठी गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. पण, आता उपराज्यपालांनी पत्र लिहिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.



























































