
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लसीकरणाची संख्या वाढवण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. मात्र देशात भाजपची सत्ता असलेले गुजरात राज्य वगळता सर्व राज्ये लसीकरणात महाराष्ट्राच्या प्रचंड मागे असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. देशात सर्वात कमी म्हणजे फक्त 7 हजार 521 नागरिकांचे लसीकरण लक्षद्वीप बेटावर झाले आहे तर महाराष्ट्राने 70 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करून संपूर्ण देशात अव्वल स्थान राखले आहे.
राज्यात लसीकरणाच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना लसीकरणाची माहिती दिली होती. इतर राज्यांतील लसीकरणाची आकडेवारी पाहिल्यावर त्याची त्वरित प्रचीती येते. 3 एप्रिलच्या आकडेवारीनुसार तर राज्यातील 70 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे स्पष्ट दिसते. दोन दिवसांपूर्वी तर एका दिवसात राज्यातील तीन लाख नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.
केंद्राच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा अत्यंत आक्रमकपणे आरोप केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे, पण केंद्र सरकार महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
केंद्राकडून अजूनही पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. आपण केंद्राकडे लसींचा पुरवठा वाढवून मागितला आहे आणि मान्यही होईल. ही मागणी मान्य झाल्यावर दररोज सहा ते सात लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे.
– उद्धव ठाकरे मुख्यमंत्री
अरुणाचल प्रदेश – 1,0226
आसाम – 11,76124
बिहार – 31,21393
गोवा – 1,30175
गुजरात – 65,78274
हरयाणा – 17,14570
हिमाचल प्रदेश – 5,95692
कर्नाटक – 42,9894
मध्य प्रदेश – 39,43340
महाराष्ट्र – 70,27500
मणिपूर – 1,15544
मेघालय – 1,20146
मिझोरम – 71,868
नागालॅण्ड – 83,771
त्रिपुरा – 7,385
उत्तर प्रदेश – 64,28073
उत्तराखंड – 8,26674
दमण-दीव – 17893
देशात सर्वात कमी म्हणजे फक्त 7 हजार 521 नागरिकांचे लसीकरण लक्षद्वीप बेटावर झाले आहे
लसीकरणाची देशातील आकडेवारी
अंदमान-निकोबार बेट – 22 हजार 867
आंध्र प्रदेश – 29 लाख 7 हजार 602
चंदिगड – 31 लाख 21 हजार 393
छत्तीसगड – 25 लाख 17 हजार 456
दादरा-नगर-हवेली – 19 हजार 681
नवी दिल्ली – 14 लाख 29 हजार 913
जम्मू-कश्मीर – 8 लाख 89 हजार 734
झारखंड – 17 लाख 46 हजार 722
केरळ – 37 लाख 20 हजार 447
लडाख – 56 हजार 108
लक्षद्वीप – 7 हजार 521
ओडिशा – 26 लाख 99 हजार 452
पुद्दचेरी – 77 हजार 771
पंजाब – 10 लाख 90 हजार 090
राजस्थान – 61 लाख 51 हजार 585
सिक्कीम – 79 हजार 904
तामीळनाडू – 31 लाख 1 हजार 478
तेलंगणा – 13 लाख 94 हजार 119
पश्चिम बंगाल – 57 लाख 72 हजार 282


























































