आश्चर्य! म्हशीनं दुतोंडी पारडीला जन्म दिला, सगळं गाव झालं गोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
buffalo-gave-birth-to-2-head-calf

वाराणसीमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका म्हशीनं दोन तोंडं असणाऱ्या पारडीला जन्म द‍िला आहे. जन्मानंतर तिची तपासणी केली असता पारडी स्वस्थ असल्याचं सांगण्यात आलं.

वाराणसीच्या कँट भागातील सिकरौलमध्ये एका म्हशीनं दुतोंड्या पारडीला जन्म दिला. हे वृत्त वाऱ्याच्यावेगानं पसरलं. काहीवेळातच इथं लोकांनी गर्दी केली. लोकांनी मोबाइलवरून फोटो, व्हिडीओ घेत सोशल मीडियावरून शेअर करण्यास सुरुवात केली.

म्हशीच्या तबेल्याचे मालक राममूरत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडीला जन्म देताना त्यांच्या म्हशीला बराच त्रास झाला. पारडी बाहेर येताना अडचण होत होती. अनेक तास मेहनत घेऊन पारडीचं दुसरं तोंडं दिसलं आणि मग अत्यंत सावकाशपणे तिला बाहेर काढण्यात यश आलं.

म्हशीनं दुतोंडी पारडीला जन्माला घातलं ही बातमी कळताच लोकांनी प्रचंड गर्दी केली. सगळ्या गावात याच घटनेची चर्चा सुरू होती. सारेजण या तबेल्याकडे धाव घेत होते.

सध्या म्हैस आणि पारडी दोघंही स्वस्थ असल्याचं सांगण्यात आलं. तर प्रत्येकजण या घटनेचं आपापल्या पद्धतीनं आकलन करत आहे.