वाशिष्ठी नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू

sunk_drawn

रत्नागिरी तालुक्यातील कालुस्ते येथील वृद्धाचा वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू झाल्याचा घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. याबाबत येथिल पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सिताराम सोनू तांबे (65) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा उमेश सिताराम तांबे याने खबर दिलेल्या फिर्यादीनुसार सिताराम तांबे हे मोलमजुरीचे काम करीत असत. गुरूवारी दुपारी अडीच वाजता कामानिमीत्त ते घराबाहेर निघून गेले.

रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांची शोधाशोध केली. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अशातच शुक्रवारी सकाळी कालुस्ते साईनगर येथे वाशिष्ठी नदीपात्रात ते मृत अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेंबल मनोज कांबळे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या