ज्या पदार्थांना शाकाहारी समजतो, ते प्रत्यक्षात असतात मांसाहारी.. वाचा सविस्तर

अनेकांना मांसाहार पूर्ण वर्ज्य असतो. त्यांना फक्त शाकाहारच घेतात. पण, बाजारात मिळणारे अनेक पदार्थ हे शाकाहारी वाटले तरी ते मांसाहारी असतात. म्हणजे प्राणिजन्य घटकांपासून ते बनलेले असू शकतात. पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत, जे प्राणिजन्य घटकांपासून बनवले जातात.

चीज

चीज या पदार्थाचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. पण हे चीज संपूर्णतः शाकाहारी नाही. चीजमध्येही काही प्रमाणात प्राणिजन्य घटक असतात. काही खास प्रकारच्या चीजमध्ये रेन्नेट नावाचा घटक असतो. हा घटक वासराच्या पोटातून काढला जातो. त्याचा वापर चीजला घट्टपणा येण्यासाठी केला जातो. अर्थात बाजारात हे घटक न मिसळलेलं चीजही उपलब्ध असतं.

ओमेगा 3

ओमेगा 3 हा घटक काही पदार्थांमध्ये निसर्गतःच आढळून येत नाही. पण, ते पदार्थ ओमेगा 3ने पुरेपूर भरलेले असल्याचा आभास जाहिराती निर्माण करतात. असे पदार्थ शाकाहारी नसतात. त्यात मास्यापासून मिळणारे काही घटक मिसळलेले असतात. ज्यांना ओमेगा 3चे नैसर्गिक स्रोत हवे असतील त्यांनी आहारात अळशी, चिया सीड्स आणि अक्रोडसारखे पदार्थ समाविष्ट करावेत.

सॉफ्ट ड्रिंक

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये जिलेटिन नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ जनावरांच्या अवयवांपासून बनतो. याचा वापर सॉफ्ट ड्रिंक्सना दाटपणा येण्यासाठी केला जातो.

साखर

हे नाव वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेक ठिकाणी साखर ही नैसर्गिकरित्या ब्लिच म्हणजे पांढरी शुभ्र केली जाते. त्यात जनावरांच्या हाडांचा उपयोग केला जातो. ब्राऊन शुगरमध्ये देखील या घटकाचा वापर होतो.

व्हॅनिला आईस्क्रीम

व्हॅनिला फ्लेवरच्या आईस्क्रीममध्ये ऑटर या प्राण्याच्या अवयवांपासून बनलेल्या घटकांचा वापर केलेला असतो. त्याला कॅस्टोरम म्हणतात. व्हॅनिला फ्लेवर मिळवण्यासाठी कॅस्टोरमचा वापर केला जातो. अर्थात हे खाण्याने काही नुकसान होत नाही.

खारे शेंगदाणे

काही ब्रँड्सच्या खाऱ्या शेंगदाण्यांमध्ये मसाले आणि मीठ मिसळण्यासाठी जिलेटिन वापरलं जातं, जो प्राणिजन्य घटक आहे.

बारबेक्यु बटाटा चिप्स

अशा प्रकारच्या चिप्समध्ये चिकन फॅट्स मिसळलेले असू शकतात. अर्थात त्याचा उल्लेख पॅकेटवर केलेला असतो, तो तपासून घ्यावा लागतो.

हार्ड कोटेड कँडी

ज्यांना कवच असतं असे चॉकलेट्स किंवा कँडीजमध्ये शेलॅक नावाचा घटक वापरलेला असतो. जो एकाप्रकारच्या किड्याच्या मादीपासून निघणाऱ्या स्रावापासून बनतो.

आपली प्रतिक्रिया द्या