दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या तरुणावर काळाचा घाला, एक जण गंभीर जखमी, आष्टी तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या सणासाठी गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला तर दुसऱ्या तरुणाचा जगीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बालेवाडी फाटा येथे रविवारी पहाटे घडली. मोहन पाडुरंग बर्वे (रा. वरवंटी, गंगाखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील वरवंटी येथील मोहन पाडुरंग बर्वे आणि पालमचा सिध्देश्वर दिंगाबर धुळगुडे हे दोघे मित्र चाकण येथे एका खाजगी कंपनीत काम करतात. दिवाळी सणासाठी दोघेही सुटी घेऊन रविवारी पहाटे दुचाकीवरून (क्र. एमएच 22 एकएक्स 1205) गावी निघाले. बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील बाळेवाडी फाटा येथे पहाटे चार वाजता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मोहनचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे अंमलदार मनोज खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. मृताचे कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.