
लैंगीग क्षमता वाढविण्यासाठी विआग्रा ही गोळी घेत असाल तर सावध व्हा. कारण विआग्राचा ओव्हर डोस तुमचा संसार उध्वस्त करु शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. या औषधाचा वापर करणाऱ्या एका तरुणाने आपली व्यथा मांडत तज्ज्ञांची मदत मागितली आहे. तसेच सगळ्यांना याचे सेवन करु नका असे आवाहनही केले आहे.
इसमाने दिलेल्या माहीतीनुसार, तरुणाचे लग्न झाले होते. तो लैगीक क्षमता वाढविण्यासाठी विआग्रा गोळी घेत होता. मात्र त्याच्या मित्रांच्या सांगण्यावरुन तरुणाने विआग्राचा डोस वाढवला. पण त्यानंतर जे झाले ते फार भयंकर झाले. त्यानंतर त्या तरुणाला फार त्रास होऊ लागला. त्याने अलाहाबादमधल्या एका डॉक्टरांना दाखवले असता, त्यांनी त्याचा मृत्यू होणार असल्याचे सांगितले. हे ऐकून तरुणाच्या पायाखालची जमिन सरकली. त्याने विआग्राचा ओव्हर डोस झाल्याने तो नपुंसक झाला. तो प्रचंड निराश झाला आणि लैंगीक सुखाशिवाय आयुष्यात काहीच नाही असे वाटायला लागले. विआग्राचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा संसार सुरु होण्याआधीच संपुष्टात होण्याच्या मार्गावर होता.
त्यानंतर भेदरलेल्या त्या तरुणाने दिल्लीच्या नामांकित पी. के.गुप्ता डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र तिथेही निराशा हाती आली. त्यानंतर तो प्रयागराजच्या मोतीलाल मेडीकल कॉलेजमध्ये जिथे त्याच्यावर योग्य उपचार झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती उत्तम आहे. तो वडिल होऊ शकतो. यावेळी तरुणाने विआग्रा गोळी घेऊ नका, खूप घातक गोळी आहे, त्याने माझं आयुष्य उद्धस्त झालं असं आवाहनही केलं.
























































