‘उरी’च्या यशानंतर विकी कौशलची चांदी, रणवीरसोबत ‘औरंगजेब’ साकारणार

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘मसान’ या आपल्या पहिल्या चित्रपटातून छाप सोडणारा अभिनेता विकी कौशल याने बॉलिवूडमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनुराग कश्यपच्या ‘रमन राघव’ ते ‘मनमर्जीयां’, ‘संजू’ आणि ‘राजी’ व आता ‘उरी’ या चित्रपटाच्या यशानंतर सध्या चर्चेत बॉलिवूडमध्ये विकी चालणारा सिक्का आहे.

बॉलिवूडमध्ये एकामागोएक हिट चित्रपट दिल्यानंतर विकीच्या चाहत्यांची संख्याही वाढली आहे. एकट्याच्या बळावर तिकीट खिडकीवर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवू शकतो एवढा विश्वास त्याने निर्मात्यांना नक्कीच दिला आहे. याचाच फायदा त्याला आगामी चित्रपटातील भूमिका मिळवण्यासाठी झाला आहे असेच म्हणावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये विकी कौशल रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.

करण जोहरच्या ‘तख्त’ या आगामी चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात रणवीर सिंह दारा शिकोहची भूमिका साकारणार आहे. तर आता विकी औरंगजेबच्या भूमिकेमध्ये दिसेल. यासाठी करणने पुन्हा एकदा त्याची भूमिका लिहिण्याचे मनावर घेतले आहे. औरंगजेबने दारा शिकोह या आपल्या लहान भावाला सत्तेसाठी मृत्यूच्या दारात ढकलले होते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या चित्रपटात रणवीरच्या जोडीला विकीची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे.

मुगल इतिहासावर या चित्रपटामध्ये रणवीर सिंह, करीना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, अनिल कपूर, भूमी पेडनेकर आणि जान्हवी कपूर हे सितारे दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या