
उत्तर हिंदुस्थानात कोजागरी पौर्णिमा आली की पौर्णिमेनंतरच्या करवा चौथचे वेध तमाम महिलावर्गाला लागतात. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानातील शहरांपासून गावापर्यंत अनेक बाजाराची ठिकाणं गर्दीने फुलून जातात. याच करवा चौथसाठी गेलेल्या महिलांमध्ये राडा झाल्याचं वृत्त आहे.
त्याचं झालं असं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही करवा चौथसाठी उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे. असंच उत्तर प्रदेशच्या एटा येथील बाबूगंज परिसरात सोमवारी बायकांची खरेदीची झुंबड उडाली होती. बुधवारी करवाचौथ असल्याने बायका दुप्पट उत्साहाने खरेदी करत होत्या.
याच दरम्यान तिथे शॉपिंग करत उभ्या असलेल्या एका महिलेला शेजारी उभी असलेली तरुणी आंटी म्हणाली. त्यावरून महिलेचा संताप अनावर झाला आणि तिने चक्क हातातली शॉपिंग बाजूला ठेवत तरुणीला मारायला सुरुवात केली. तरुणीनेही तिला अडवायचा प्रयत्न केला, मात्र महिला तिला मारत राहिली.
बाजारात गोंधळ झालेला पाहून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस तिथे आल्या आणि त्यांनी हा राडा थांबवला. सुरुवातीला त्यांना हा नेमका प्रकार उलगडला नाही. जेव्हा हा राडा थांबवण्यात आला तेव्हा पोलिसांना हा आंटीचा प्रकार कळला.
पाहा व्हिडीओ-
























































