बाई गेल्या! नाट्या चळवळीच्या अध्वर्यू विजया मेहता यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजयाबाई गेल्या! सत्तर वर्षांचा नाटय़ झंझावात शांत झाला!! मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी घरी अखेरचा श्वास घेतला. विजयाबाई म्हणजे प्रायोगिक नाटय़ चळवळीच्या अध्वर्यू होत्या. अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणाऱ्या या प्रतिभाशाली नाटय़दिग्दर्शिका!! रंगभूमीचे चालतेबोलते विद्यापीठ, ज्यांनी अनेक दिग्गज कलावंतांना घडवले. अनेक दशके रंगभूमीवरला त्यांचा ‘झिम्मा’ विलक्षणच राहिला. आज नाटय़पर्व काळाच्या पडद्याआड गेले. बाईंच्या एक्झिटने अवघी मनोरंजनसृष्टी सुन्न झाली आहे.