दमदार अभिनयाने रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवून रसिकांवर अधिराज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.