विनय घोरपडे, केदारी पवार यांना एसीपीपदी बढती

मुंबई पोलीस दलात काम करताना चमकदार कामगिरी करणारे वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे व केदारी पवार यांना एसीपीपदी बढती मिळाली आहे. त्यांच्या बरोबर गजानन पडघण यांनाही सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.

विनय घोरपडे, केदारी पवार व गणपत पडघण यांच्या एसीपी बढतीचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. घोरपडे यांची एसीपीपदी बढती करून त्यांची ठाण्यात बदली करण्यात आली. तर केदारी पवार यांना मुंबई दाखविण्यात आली. तर पडघण यांना एसीपीपदी पदोन्नती करून त्यांची अमरावती येथे बदली दाखविण्यात आली आहे.

विनय घोरपडे व केदारी पवार यांनी मुंबई गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवर काम बजावले आहे. अत्यंत क्लिष्ट गुह्यांची उकल करण्याचे काम या अधिकाऱ्यांनी लीलया केले आहे.