
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाचा डाव 191 धावांमध्ये आटोपला. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर कर्णधार विराट कोहली याने 50 धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजार धावांचा टप्पाही पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 23 हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे.
ओव्हल कसोटीमध्ये पहिली धाव घेताच विराट कोहली याने इतिहाच रचला. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी 490 डावांमध्ये 23 हजार धावांचा टप्पा पार केला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. सचिनने यासाठी 522 डाव खेळले होते. तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पॉन्टिंगने 544, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिसने 551 आणि श्रीलंकेचा खेळाडू कुमार संघकारा याने 568 डावांमध्ये अशी कामगिरी केली होती.
23K and counting…@imVkohli | #TeamIndia pic.twitter.com/l0oVhiIYP6
— BCCI (@BCCI) September 2, 2021
विराट कोहली गेल्या दीड वर्षापासून शतक झळकावू शकलेला नाही. इंग्लंडविरुद्ध मालिकेतही त्याने दोनदा अर्धशतकापर्यंत मजल मारली, मात्र अर्धशतकाचे रुपांतर त्याला शतकामध्ये करता आले नाही. ओव्हलमध्ये विराट कोहली 50 धावांवर बाद झाला.




























































