World cup 2019 विजयी सलामीसाठी टीम इंडिया सज्ज, विराटचा ‘मास्टर प्लान’ तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । साऊथहॅप्टन

बुधवारी 5 जूनपासून टीम इंडिया World cup 2019 चा शुभारंभ करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध रंगणार आहे. पहिल्या लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर प्लान तयार असल्याचे सांगितले. 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळलेल्या संघापेक्षा आताचा संघ बलवान असल्याचे विराटने सांगितले. चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव सहन करावा लागला होता.

मॅक्यूलमची भविष्यवाणी बांगलादेश, पाकिस्तानने चुकवली
टीम इंडियाविरुद्धच्या लढतीपूर्वी आफ्रिकेला धक्का, स्टेन दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार

विराट पुढे म्हणतो, ‘दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत आणि खतरनाक आहे. त्यांच्याकडे चांगले पर्याची खेळाडूही आहेत. आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखत नाही. आम्ही आमची ताकद आणि लढवर लक्ष केंद्रीत करणार आहोत.’ तसेच चॅम्पियन ट्रॉफीनंतर टीम इंडियाने संघात बदल केले आहेत. मधल्या काही षटकांमध्ये विकेट मिळवण्यासाठी जादूई फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यासह एक संतुलित संघ मैदानात उतरवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही विराट म्हणाला.

कर्णधार म्हणून पहिलाच वर्ल्डकप खेळणारा विराट म्हणाला, हा माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. याआधी कोहली 2011 आणि 2015 मध्ये झालेल्या वर्ल्डकप संघाचा सदस्य होता. या दोन्ही वर्ल्डकपमध्ये विराटने शतकी खेळी केलेल्या आहेत. कोहलीला शतकाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही चांगला खेळ करत असतात तेव्हा तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा जास्त असतात.

पाकिस्तानचे अभिनंदन करून सानिया नेटिझन्सच्या निशाण्यावर, 16 ला कोणाला पाठिंबा?

केदार जाधव फिट
केदार जाधवच्या फिटनेसबाबद विचारण्यात आले तेव्हा कोहलीने सांगितले की, केदार सध्या नेट्समध्ये फलंदाजी करत असून जवळपास तो पूर्ण फिट आहे. केदार एक उपयुक्त खेळाडू असून त्याच्या समावेशामुळे संघ संतुलित होतो.