विराट कोहलीला विश्रांती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

न्यूझीलंडकिरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसह टी-20 मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी पहिला सामना संपल्यानंतर ही माहिती दिली. विराटच्या जागी अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये व टी-20 मालिकेमध्ये रोहित शर्मा नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 असे तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करण्यापूर्वी विराटला विश्रांती देण्यात यावी असे संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने सुचवल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱयाने सांगितले. 2018 पासून विराट सातत्याने खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. श्रीलंकेत झालेला निदास चषक, अफगाणिस्तानविरुद्ध झालेली एकमेक कसोटी व आशिया कप तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली होती. विराट कोहलीने 2018 पासून आतापर्यंत 14 ते 15 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 1345 धावा चोपल्या आहेत. याचदरम्यान त्याने 18 एकदिवसीय सामन्यांत 1400 पेक्षा जास्त धावा ठोकल्या. याच दमदार कामगिरीमुळे त्याला आयसीसीच्या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.