
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय हा मोदींच्या भूमिकेत दिसेल. या चरित्रपटाचे नाव आहे ‘पीएम नरेंद्र मोदी. विवेक या सिनेमात तरुणपणीच्या मोदींची भूमिका करीत आहे. परेश रावल नंतरच्या काळातील मोदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मेरी कोम आणि सरबजीत या बायोपिकचे दिग्दर्शन करणारे उमंग कुमार हे पीएम नरेंद्र मोदी चे शिवधनुष्य पेलणार आहेत. लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे. गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे सिनेमाचे शूटिंग होईल. गेल्या काही वर्षांपासून झगमगत्या दुनियेपासून फारकत घेतलेला विवेक पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे.

























































