व्हॉईस मेसेज बनेल टेक्स्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप  एक खास फीचर घेऊन येणार आहे. या फीचरमुळे व्हॉईस मेसेज आता टेक्स्ट मेसेज बनवून दुसऱयांना पाठवता येईल. व्हॉट्सअॅप व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन असे आगामी फिचरचे नाव आहे. व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात येणाऱया व्हॉईस मेसेजच्या कंटेन्टला ट्रान्सक्रिप्ट केले जाईल. सध्या हे फीचर आयओएस अॅपसाठी विकसित केले जात आहे. अँड्राईड अॅपसाठी ते कधी उपलब्ध होईल, याबाबत अद्याप तरी काही सांगता येणार नाही.