वडवणी सेवा सोसायटी निवडणुकीत भाजपाला पुन्हा धक्का; राष्ट्रवादीची बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp logo

नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीमध्ये सत्ता ताब्यात असणाऱ्या भाजपाला वडवणीत चपराक बसली आहे. राष्ट्रवादीने 9 जागा जिंकत आघाडी घेतली आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसातच झालेल्या सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही भाजपाला मोठा हादरा बसला आहे. तब्बल 12 जागा जिंकत राष्ट्रवादीने बाजी मारली तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

वडवणी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना वाटाघाटी झाल्या नाहीत आणि निवडणूक लागली. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. रविवारी झालेल्या या निवडणुकीत भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक झाली. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके आणि माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या गटाने भाजपाचा धुव्वा उडवला. 13 पैकी 12 जागा जिंकत सोसायटीवर वर्चस्व निर्माण केले. भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी हा महत्वाचा दुवा मानला जातो. नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाला हादरा बसला आहे.