वयानुसार पावलं मोजून चाला

चालणं हा व्यायाम सगळ्यांसाठी उपयुक्त असला तरी आपण किती चालवं, कसं चालाव याचेही काही नियम असतात. काही वेळेस अती चालण्याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे खाली दिलेल्या कोणत्या वयात तुम्ही बसता, ते ठरवून तेवढी पावलं चाला. नक्कीच फायदा होईल. हल्ली बाजारात स्मार्ट घड्याळं, बँड्स मिळतात त्यावर सहज आपण किती पावले चाललो ते समजते. 

वयानुसार रोज इतकी पावलं चाला –

5 ते 18 वयोगट – वयवर्ष पाच ते अठरा वर्षाच्या मुलांनी पंधरा हजार पावलं चालायला हवी. तर मुलींनी तेरा हजार पावलं चालायला हवीत.

19 ते 40 वयोगट- 19 ते 40 वयोगटातील पुरुष आणि महिलांनी दिवसभरात किमान 13 हजार पावलं चालायला हवीत.

40 वयोगटानंतर – 40 वयोगटातील लोकांसाठी दिवसाला 12 हजार पावलं चालणं फायदेशीर ठरवलं जातं.

50 वयोगट – पन्नाशीच्या लोकांनी नियमित 9000 ते 10000 पावलं चालायलाच हवीत.

60 वयानंतर – साठीनंतरच्या लोकांनी सुदृढ राहण्यासाठी दिवसातून 7 ते 8 हजार पावलं चालायला हवीत. पण याबरोबर हेही लक्षात ठेवा, की आपण कितीपर्यंत चालू शकतो. दम लागला तर चालणं थांबवा. आपण किती पावले चाललो याची मोजणी स्मार्टफोनवर असलेल्या फिटनेस अॅपच्या माध्यमातून घेऊ शकता. या अॅपमुळे आपण किती चाललो तेवढी पावले मोजता येतात आणि किती कॅलरी बर्न झाल्या हे देखील पाहता येते.

उभं पाहण्याची पद्धत-

चालताना प्रत्येकाने आपल्या उभं राहण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. उभं राहण्याच्या चुकीच्या पद्धतीने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उभं राहताना सरळं उभं राहावं.

हातांची पोजिशन –

चालताना हाताच्या मुठी बंद करुन न चालता हात मोकळे ठेऊन चाला. हाताच्या मुठी बंद करुन चालल्याने खांद्यांनाही त्रास होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या