शास्त्रज्ञांनी विकसित केली युरीन इन्फेक्शन दूर करणारी लस

अमेरिकेतील ड्युक युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी मूत्र मार्गाच्या (युरिनरी ट्रक्ट) संसर्गाचा त्रास दूर करणारी लस विकसित करण्यात यश मिळवले आहे. जगभरात 50 टक्के महिलांना तर हिंदुस्थानात 10 पैकी 5 महिला आणि 3 पुरुषांना युरिनरी ट्रक्टच्या जंतुसंसर्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवी करताना जळजळ आणि कंबरदुखीचा असह्य त्रास सहन करावा लागतो. अमेरिकन संशोधकांनी बनवलेली लस आयुष्यात एकदा घेतल्यास मूत्रमार्गाचा संसर्गाचा धोका निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना शरीराबाहेर काढेल. त्यामुळे अशा व्यक्तीला युरिनरी इन्फेक्शनच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. या लसीचा प्रयोग उंदरांवर 100 टक्के यशस्वी झाला आहे. युरिनरी इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण रोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे, लघवी कधीही तुंबवून ठेवू नये, अँटिबायोटिक्स औषधे अधिक घेणे टाळावे, तेल आणि मसालेदार चटपटीत खाणे टाळावे, आहारात व्हिटॅमिन्स भरपूर असलेले अन्न नेहमी खावे असा सल्ला ड्यूक विद्यापीठाचे प्रो. सोमरन अब्राहम यांनी जगभरातील नागरिकांना दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या