कोरोनामुक्त 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो – आरोग्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं. उद्या नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आहे, यावेळी मी थांबणार, कोरोनाला हरवणार!, असा संकल्प घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत ही समाधानाची गोष्ट असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचे दोन रूग्ण आयसीयूत असून इतरांची प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने बघू नका, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

कोणत्याही डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नये अशी विनंती देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. बाधित लोकांशी माणुसकी सोडून वागू नये, ते गुन्हेगार नाहीत. महाराष्ट्रातील तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून फिलिपाईन्सचा नागरिक कोरोना निगेटिव्ह होता, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोना बरा होऊ शकतो, 106 रुग्णांपैकी केवळ दोघांची स्थिती गंभीर असून 15 जणांना डिस्चार्ज मिळू शकतो, असेही ते म्हणाले.