
सामना प्रतिनिधी । ऍडलेड
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये देशाला सुपर पॉवर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आगामी वर्षामध्ये त्याच ध्येयाने तो मैदानात उतरणार आहे.युवा खेळाडूंचे झटपट क्रिकेटवरील प्रेमाबाबतही त्याने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, सध्याच्या पिढीला ट्वेण्टी-20 क्रिकेटची ओढ असते, मात्र त्यामुळे त्यांना कसोटी क्रिकेट खेळताना अडचण निर्माण होते. आम्ही कसोटीत दमदार कामगिरी करून देशातील युवकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही तो पुढे विश्वासाने म्हणाला.

























































