वेब न्यूज – पृथ्वी आणि ऑक्सिजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

प्रत्येक सजीवासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो ऑक्सिजन. या वायूचे पृथ्वीसाठी असलेले महत्त्व हे सर्व आपण शाळा, कॉलेजात अभ्यासलेले असते. अशा या ऑक्सिजनसंदर्भात लोकांना बरेच अनोखे प्रश्नदेखील पडत असतात. समजा पृथ्वीवर आता जे ऑक्सिजनचे प्रमाण आहे, ते अचानक वाढले तर किंवा कमी झाले तर? समजा काही काळासाठी पृथ्वीवर ऑक्सिजन गायब झाला, तर हाहाकार माजेल. सर्व सजीवांची चेतना नाहीशी होण्यास सुरुवात होईल, झाडे आणि वनस्पतीदेखील यातून सुटणार नाहीत. संपूर्ण पृथ्वी अंधारात बुडेल, आगदेखील जळणार नाही. हवेतील विमाने जमिनीवर आदळतील, घरे व बंगले पत्त्यासारखी कोसळतील, निळे आकाश काळे पडेल. मात्र याच्या उलटे म्हणजे पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण वाढले तर होणारे परिणाम फार मजेशीर असणार आहेत. सध्या पृथ्वीवर 21 टक्के ऑक्सिजन आहे. त्याचे प्रमाण दुप्पट झाल्यास पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या आकारात बदल होण्यास सुरुवात होईल. वैज्ञानिकांच्या मते मानवाची उंची सात फुटांपर्यंत पोहोचेल आणि शरीरयष्टीने मान हल्कसारखा धष्टपुष्ट आणि अगडबंब दिसायला लागेल. झाडांची उंचीदेखील प्रचंड वाढेल आणि ती आकाशाला टेकतील. पृथ्वीवरच्या मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या आकारात तीनपट बदल होईल. लहान कीटक हे कोळय़ाच्या आकाराचे दिसायला लागतील आणि कोळी उंदीर, सशाच्या आकाराचे दिसायला लागतील. मात्र मोठय़ा प्रमाणावर आगी लागण्याचा धोकादेखील संभवतो. संशोधकांच्या मते 300 वर्षांपूर्वी पृथ्वीवरची ऑक्सिजनची पातळी ही आजच्या पेक्षा खूप जास्त म्हणजे साधारण 30 टक्के इतकी होती. त्या काळात मानव आणि प्राणी हे दोघेही प्रचंड आकाराचे आणि शक्तिशाली होते. त्यामुळे पृथ्वीवर जर संतुलन कायम राहायला हवे असेल, तर ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य राहणे गरजेचे आहे. ते वाढायला नको आणि कमीदेखील व्हायला नको.