
शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला दोन मिनिटांत चीतपट करून 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची चांदीची गदा जिंकली. मात्र, या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या विविध 9 वजनी गटातील माती व गादी विभागातही अनेक थरारक अन् चटकदार कुस्त्या बघायला मिळाल्या. यात सोलापूरच्या जोतिबा अटकलेने सलग पाचवे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
पुण्यातील कोथरूड येथे माजी पहिलवान मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचे 10 ते 14 जानेवारीदरम्यान नेटके अन् देखणे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक गरीब घरातील मुलांनी पदके जिंकली. बीडच्या आतिश तोडकरने बापाने त्याच्यासाठी विकलेल्या शेतीचं चीज करून दाखवलं. पहिल्या प्रयत्नात कांस्य, दुसऱया रौप्य, तर यंदा तिसर्या प्रयत्नात सुवर्णपदक जिंकून त्याने मातीचं सोनं करून दाखविलं. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या मुख्य कुस्तीबरोबरच इतर वजनी गटातील कुस्ती स्पर्धाही मोठय़ा चुरशीनं लढल्या गेल्या.
माती विभाग ः 57 किलो ः सौरभ इगवे (सोलापूर शहर), रोहित तामखेड (सांगली), ओमकार निगडे (पुणे जिल्हा); 61 किलो ः जोतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा), संदीप बोडके (नाशिक शहर), अमोल वालगुडे (पुणे जिल्हा); 65 किलो ः सूरज कोकाटे (पुणे जिल्हा), पंकज पवार (लातूर), कुलदीप पाटील (कोल्हापूर जिल्हा); 70 किलो ः अनिल कचरे (पुणे जिल्हा), निखिल कदम (पुणे शहर), आतिश आव्हाळे (धुळे); 74 किलो ः श्रीकांत निकम (सांगली), सताप्पा हीरगुडे (कोल्हापूर जिल्हा), ऋषिकेश शेळके (नगर); 79 किलो ः विशाल कोकाटे (सातारा), गोपीनाथ सुतार (सोलापूर जिल्हा), अंकुश माने (सांगली); 86 किलो ः अर्जुन काळे (भंडारा), सचिन पाटील (वाशिम), राहुल काळे (सोलापूर जिल्हा); 92 किलो ः बाबासाहेब तरंगे (पुणे जिल्हा), श्रीनिवास पाथरुट (सोलापूर जिल्हा), रोहन रंडे (कोल्हापूर जिल्हा); 97 किलो ः सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर), युवराज चव्हाण (नगर), जगदीश चरावडे (जालना); महाराष्ट्र केसरी खुला वजन गट ः महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा), सिपंदर शेख (वाशिम), शुभम सिदनाळे (कोल्हापूर जिल्हा).
अंतिम निकाल ः गादी विभाग (सुवर्ण, रौप्य, कांस्य) ः 57 किलो ः आतिश तोडकर (बीड), सूरज आसवले (कोल्हापूर जिल्हा), विजय मोझर (पुणे शहर), अतुल चेचर (को.शहर); 61 किलो ः भारत पाटील (को.शहर), विजय पाटील (को.जिल्हा), विशाल सुळ (सातारा) योगेश्वर तापकीर (पि.चिंचवड); 65 किलो ः सोनबा गोंगाणे (को.जिल्हा), केतन घारे (पुणे जिल्हा), शुभम पाटील (को.शहर), महेश जाधव (पिं.चिंचवड); 70 किलो ः विनायक गुरव (को.शहर), संकेत ठाकूर (पुणे शहर), मनोज घिवडे (नाशिक जिल्हा), सुमित गुजर (सातारा); 74 किलो ः रविराज चव्हाण (सोलापूर जिल्हा), आकाश देशमुख (लातूर), महेश फुलमाळी (नगर), राकेश तांबुळकर (को. जिल्हा).




























































