भाजप खासदाराच्या कारवर बॉम्ब हल्ला

698

पश्चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघातील भाजप खासदार अर्जुन सिंग यांच्या कारवर काही अज्ञान इसमांनी विटा आणि बॉम्ब हल्ला केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ते आपल्या कारने घरी जात असताना अचानक त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांच्या कारची काच फुटली आहे. या हल्ल्यात त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. भाजपच्या खासदारावर हल्ला झाल्याची बातमी समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

अर्जुन सिंग यांनी आपल्यावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘टीएमसीच्या गुंडांनी माझ्या गाडीवर विटा फेकल्या. यानंतर मी माझ्या कारमधून बाहेर पडलो आणि मला एक माणूस जमिनीवर पडलेला दिसला. गणेश सिंह असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मग अचानक माझ्या गाडीवर बॉम्ब टाकण्यात आला.’ ते पुढे म्हणाले की, ‘पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी.’

दरम्यान, याआधीही त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या