आयसीसी टॉप टेन रँकिंगमध्ये तीन हिंदुस्थानी

374
virat-kohli

वेस्ट इंडीजविरुद्धच्या 3 टी-20 लढतींच्या मालिकेतील तुफानी फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 5 स्थानांची झेप घेत आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये 10 व्या स्थानावर मजल मारली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 गुणांकनात तीन हिंदुस्थानी फलंदाजांनी टॉप 10 फलंदाजांत स्थान मिळवले आहे.

हिंंदुस्थानचा सलामीवीर के. एल. राहुल या यादीत 734 अंकांसह सहाव्या स्थानी असून ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 686 गुणांसह नवव्या आणि कर्णधार विराट कोहली 685 गुण मिळवत दहाव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा बाबर आझम याने 879 गुणांसह टॉपचे स्थान स्वतःकडे राखले आहे.

ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच 810 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. विशेष म्हणजे टी-20 तील टॉप टेन फलंदाजांत ऑस्ट्रेलियाच्या दोन तर हिंदुस्थानच्या तीन फलंदाजांनी स्थान मिळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या