‘साली’ खरचं झाली ‘आधी घरवाली’; एकाच मंडपात दोघींशी लग्न

1982
dileep-parihar-vinita-rachana

एकाच मंडपात पत्नी आणि तिच्या मामाच्या बहिणीसोबत लग्न करणाऱ्या नवरदेवाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोसोबत अनेक कॅप्शन देखील शेअर होत आहेत. मात्र या फोटो मागची स्टोरी वेगळीच आहे.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्याहून 30 किलोमीटर लांब असलेल्या एका गावातील व्यक्तीनं एकाच वेळी, एकाच मंडपात पत्नी व मेहुणी सोबत लग्न केलं.

मिळालेल्या माहिती नुसार दिलीप परिहार (35) व विनीता देवी (28) यांचे नऊ वर्षापूर्वी लग्न झालं होतं. या दोघांना तीन मुलंही आहेत. असं असताना देखील गुदावली गावात 26 नोव्हेंबर रोजी दिलीप परिहारनं दुसरं लग्न केलं. दिलीपनं 22 वर्षाची मेहुणी रचना हिच्या सोबत लग्नाचे फेरे घेतले. त्यानंतर स्टेजवर त्याची पहिली पत्नी विनीता देवीलाही वरमाला घातली.

दोन बहिणींना एकाच मंडपात लग्न व वरमाळा घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडीओत त्या दोघी वधूच्या वेशात आहे. त्या वरमाला घालून दिलीपच्या दोन्ही बाजूला उभ्या आहेत. लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दिलीपनं सांगितले की, 9 वर्षापूर्वीच विनीता सोबत लग्न झालं होतं, विनीता सतत आजारी असते. त्यामुळे मुलांचा साभांळ कसा करणार अशी चिंता तिला होती. तिनेच मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. मुलांचा सांभाळ करू शकेल, अशीच व्यक्ती हवी असा आमच्या दोघांचं मत होतं. तेव्हा तिच्या मामाची मुलगी म्हणजे रचना मला आवडते, ती मुलांना जीव लावेल, असं मी तिला सांगितलं. तिचाही रचनावर विश्वास होता. म्हणून मामाच्या मुलीशी लग्न करण्यासाठी तिनेच मंजुरी दिली.

‘हिंदु विवाह कायद्यांर्तगत’  एखाद्या व्यक्तीने आपली पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीशी लग्न केलं तर ते गुन्हेगारीच्या श्रेणीत येतं. मात्र भिंड जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष रुडोल्फ अल्वारेस यांनी सांगितलं की, या प्रकरणात पोलिसांकडे काहीच तक्रार नाही. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या