iPhone 13 कधी होणार लॉन्च? काय असेल नवीन, जाणून घ्या…

iPhone 13 कधी लॉन्च होणार? असा प्रश्न अनेक आयफोन चाहत्यांना पडला आहे. सामान्यतः अ‍ॅपल कंपनी आपले आयफोन सप्टेंबर महिन्यात लॉन्च करते. आता iPhone 13 लॉन्चिंग संबंधित एक नवीन माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 13 चा नॉच iPhone 12 पेक्षा लहान असेल. तसेच iPhone 13 Pro मध्ये 1 टीबीचे स्टोरेज दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. नवीन iPhone 13 मध्ये 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंग स्पोर्ट देखील दिला जाऊ शकतो. iPhone 13 सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये LiDAR सेन्सर दिले जातील. कंपनी सप्टेंबरच्या मध्यात iPhone 13 लॉन्च करू शकते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, iPhone 13 सोबत ऑल्वेज ऑन मोड देखील दिले जाऊ शकते.

यावेळी कंपनी एक नवीन कलर व्हेरिएंट सादर करेल ज्याचे नाव सनसेट गोल्ड असे असू शकते. iPhone 13 ची डीझाइन iPhone 12 सारखीच असू शकते. मात्र यावेळी कॅमेराचा बंप पूर्वीपेक्षा मोठा दिला जाऊ शकतो. iPhone 13 मॉडेल्स 5 जी असतील यासाठी कंपनी Qualcomm Snapdragon X60 मॉडेम वापरणार आहे. तसेच नवीन मॉडेलमध्ये अधिक क्षमता असलेली बॅटरी देखील दिली जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या