
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार यांचे आहे की, अजित पवार गटाचे यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारले तरी तो सांगेल की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारले की राष्ट्रवादी कोणाची, तर शरद पवारांची, असेच महाराष्ट्रातील नागरिक सांगतात. निवडणूक आयोगाने जर यात बदल केला तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करेल, असे मला वाटत नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेत सत्तेत सहभागी झाले आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरच दावा केला. त्यामुळ राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाला मिळणार याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.


























































