
सोशल मीडिया ही जितकी सोयीची गोष्ट आहे तितकाच तो अवैध कृत्यांसाठीही फायदेशीर मार्ग आहे. याचा प्रत्यय दिल्लीच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना आला आहे.
वेगवेगळ्या संस्था, आस्थापनं, दुकानं, सेवा अशांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणाऱ्या जस्ट डायल या वेबसाईटचा एक अनुभव मालीवाल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. स्पा मसाजसाठी विचारणा केल्यानंतर त्यांना तब्बल 150 हून अधिक कॉलगर्ल्सची यादीच पाठवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
स्वाती मालीवाल यांनी स्पा मसाज सेवेसाठी जस्ट डायलवर एक मेसेज केला होता. त्याबदल्यात त्यांना विविध अनोळखी क्रमांकांवरून मेसेज येऊ लागले. त्यात या मुलींचे फोटो आणि दरही देण्यात आले होते. त्याचे स्क्रीनशॉट्सही मालीवाल यांनी शेअर केले आहेत. तसंच जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे विभागालाही समन्स जारी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकाराला आश्रय देण्यामागे जस्ट डायलची नेमकी भूमिका काय अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आणि दोषींना शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनाही नोटीस पाठवली आहे. जे काही शक्य आहे, ते मी करेन, असंही मालीवाल म्हणाल्या आहेत. दिल्लीत अनेक ठिकाणी स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली शरीरविक्रयाचा व्यवसाय चालतो. पोलिसांनी वारंवर त्याच्यावर कारवाई करूनही असे अवैध प्रकार सुरू आहेत.
हमने Justdial पर कॉल कर स्पा मसाज के लिए फेक इंक्वाइरी की तो हमारे फोन पर 50 ऐसे मेसेज आ गए जिसमें 150 से ज़्यादा लड़कियों के ‘रेट’ बताए गए। जस्ट डायल और दिल्ली पुलिस क्राइम ब्रांच को को समन जारी कर रही हूं, इस धंधे को बढ़ावा देने में Just Dial का क्या रोल है? pic.twitter.com/zGEHHjKEXJ
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) November 8, 2021



























































