विनयभंग प्रकरणी महिलेला शिक्षा, न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेचे कपडे फाडून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी एका महिलेला दोषी ठरवत तिला एक वर्षाची शिक्षा आणि 6 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबईत एका महानगरदंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडण्यादरम्यान आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडले होते. एवढेच नव्हे, तर पतीला तिच्यावर बलात्कार करण्यासही सांगितले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता. आरोपीने तिच्यावर आधी चप्पल फेकली. नंतर दुसऱया चप्पलने तिच्या डोक्यावर मारले. सगळ्या साक्षीपुराव्यांवरून आरोपीला शिक्षा सुनावली.