आशीष शेलारांच्या गार्डला थप्पड मारणाऱया महिलेला अटकपूर्व जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशीष शेलार यांच्या गार्डला थप्पड मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. पोलिसांनी राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला, असा युक्तिवाद महिलेच्या वकिलांनी केला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आरोपी महिलेला दिलासा दिला.

दहा दिवसांपूर्वी आशीष शेलार एका कार्यक्रमासाठी विलेपार्ले येथे जात होते. त्यावेळी माहीम कॉजवेवरून महिला दुचाकीवरून जात होती. यादरम्यान शेलार यांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक बसली. त्यावरून पोलीस आणि आरोपी महिला पूनम पाटील यांच्यामध्ये वाद झाला होता.