आता कुठे चेहरा उजळला, पायजम्याची सवय झालेय! वर्क फ्रॉम होम संपल्याने महिला झाली दु:खी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीत वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आपल्याकडे चांगली रुजली. लाखो कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये घरून काम केले. आता लस उपलब्ध झाल्यानंतर कंपन्यांनी स्टाफला पुन्हा कामावर बोलवायला सुरुवात केली आहे. एका महिलेला ऑफिसातून असाच एक ईमेल आलाय. मात्र त्यामुळे तिला फार दु:ख झालंय. तिने व्हिडियोच्या माध्यमातून आपलं दु:ख मांडलं आहे. तेही अगदी मजेशीर ढंगात. हा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हजरस सेठ नावाच्या महिलेचा हा व्हिडीओ आहे. ती म्हणत्येय, ‘तीन दिवसांपूर्वी ऑफिस सुरू होत असल्याचा मला ईमेल आला. म्हणजे आता चादर हटवून आंघोळ करून ऑफिसला जावं लागणार आणि पुन्हा लोकांची तोंडं बघावी लागणार. अजून तरी त्यांनी मला ऑफिसला बोलावलं नाहीये, आता फक्त विचारलंय की ऑफिसला येण्याबाबत काय विचार आहे, तरी माझ्या अंगावर काटा येतोय. मला यांना विचारायचं की कशासाठी ऑफिस पुन्हा सुरू करायचंय, तुमचे पैसे वाचताहेत, आता पुठे माझा चेहरा पुन्हा उजळायला लागला, सर्व डार्प सर्कल गेले. मी माझे सर्व कपडे पॅक केलेत, पायजमा घालून जगण्याची सवय झालेय.

इतकं सगळं बोलून झाल्यानंतर मात्र हजरस सेठ आपल्या बॉसचं नाव घेऊन ‘मी फक्त मजेसाठी हा व्हिडिओ बनवलाय, आधीच मार्केटमध्ये नोकऱ्या नाहीत. कृपया मला कामावरून काढू नका. सांगाल तिथे येऊन काम करायला मी तयार आहे’ असं म्हणते.  व्हिडिओवर वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.