
सध्याच्या काळात सेल्फीची क्रेझ वाढली आहे. कुठेही सेल्फी काढा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा, याची जणू लाटच आलेली आहे. सेल्फी फोटो कसा चांगला दिसेल, याकडे अनेकांचे लक्ष असते. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे.
महिला आपले फोटो फिल्टर करून पोस्ट करतात. एका नव्या संशोधनानुसार 90 टक्के स्त्रिया इंटरनेटवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी तो फिल्टर किंवा एडिट करतात. लंडन विद्यापीठाच्या संशोधनानुसार जास्तीत जास्त महिला एडिट करूनच फोटो सोशल मीडियावर टाकतात.
संशोधनात असे दिसून आले आहे की महिला त्यांच्या त्वचेचा वर्ण, त्यांची चमकदार त्वचा, जबडा किंवा नाकाचा आकार, पांढरे दातदेखील फिल्टरनं एडिट करतात. यासाठी त्या सतत नवनवीन फिल्टर्स शोधत असतात. वेगवेगळे ऍप डाऊनलोड करत असतात. त्यामुळेच लॉकडाऊनमध्ये असे ऍप आणि फिल्टर सर्चिंगमध्ये वाढ झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.




























































