
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून टीम इंडियाचा सलामीचाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. पहिल्याच लढतीत टीम इंडियाच्या रणरागिणींनी पाकिस्तानचा 107 धावांनी दारुण पराभव केला आणि विश्वचषकाची विजयाने सुरुवात केली. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेले 245 धावांचे आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ 137 धावांमध्ये गारद झाला.
हिंदुस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची एकही खेळाडू मोठी धावसंख्या रचू शकली नाही. सलामीवीर अमिन हिने सर्वाधिक 30 धावा केल्या, तर डायना बेग हिने 24 धावांचे योगदान दिले. इतर बॅटर 20 धावांचा आकडाही ओलांडू शकले नाहीत. हिंदुस्थानकडून राजेश्वरी गायकवाड हिने सर्वाधिक 4 बळी घेतले. स्नेह राणी आणि झुलन गोस्वामीने प्रत्येकी दोन, तर मेघना सिंघ आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी एक बळी घेतला.
View this post on Instagram
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या महिला संघाने धावा केल्या असून पाकिस्तानपुढे विजयासाठी 245 धावांचे आव्हान ठेवले होते. पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांनी विक्रमी शतकी भागिदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
कर्णधार मिथाली राज हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र विस्फोटक बॅटर शेफाली वर्मा शून्यावर बाद झाल्याने टीम इंडियाला धक्का बसला. यानंतर सलामीवीर स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा यांच्या अर्धशतकीय भागिदारी झाली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावा जोडल्या. मंधाना 52 धावा काढून बाद झाली, तर दिप्ती शर्मा 40 धावांवर बाद झाली.
मंधाना आणि दिप्ती बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. हरमनप्रीत कौर 5, रिचा घोष 1 आणि मिथाली राज 9 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्नेहराणा आणि पूजा वस्त्रकर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघींमध्ये 122 धावांची भागिदारी केली. या दरम्यान दोघींनीही अर्धशतकीय खेळी केली. पूजा वस्सत्रकर 67 धावांवर बाद झाली, तर स्नेहराणा 53 धावा काढून नाबाद राहिली.



























































