
प्रबोधन कुर्ला शाळेत महिला दिनाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून महिला पालकांनी स्त्रीवर आधारित गाणी, कविता, नाटिका आणि भारुडही सादर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी शाळेतील महिला शिक्षिकांनी कोरोना काळातील शाळेने विद्यार्थी, पालक यांच्यासाठी घेतलेले उपक्रम, ऑनलाइन शिक्षण आणि शाळेच्या विविध पैलूंची माहिती नाटिकेच्या रूपाने सादर केली.
विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या महिला दिनाच्या कार्यक्रमात ‘महिलांसाठी कौशल्य विकास शिबीर’ शाळेत सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एल विभागातील महापौर पुरस्कारप्राप्त वत्सला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी वर्षा तावरे (तवनोजी) आणि गायत्री याही उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रास्ताविक विशाखा परब, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग व मार्गदर्शन विद्या फलके, मुख्याध्यापक माध्य. विभाग यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली कांबळे यांनी केले तर पाहुण्यांची ओळख शुभांगी मेमाणे यांनी करून दिली.


























































