
हैदराबादमधील एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवताना पेट्रोल टाकीवर लॅपटॉप ठेवून काम करताना दिसत आहे. ‘वर्क फ्रॉम बाईक’च्या प्रकारावर नेटीजन्सनी जोरदार टीका केली आहे. या निमित्ताने आधुनिक कॉर्पोरेट संस्कृती आणि वाढत्या कामाच्या तणावावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा प्रकार हैदराबादच्या माधापूर येथील आयटी कॉरिडॉर परिसरातील हिटेक्स कमानजवळ घडला. एका कारमधून प्रवास करणाऱया व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये भररस्त्यात दुचाकीस्वार पेट्रोल टाकीवर लॅपटॉप उघडा ठेवून बाईक चालवताना दिसत आहे. वाहन चालवताना लॅपटॉप, मोबाईल किंवा कोणत्याही उपकरणाचा वापर करणे अत्यंत धोकादायक असल्याने बाईकस्वाराला नेटीजन्सने फैलावर घेतले आहे.






























































