जीउस ठरला जगातील सर्वात उंच श्वान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात उंच श्वान पाहिला आहे का, नसेल तर गिनीज बुकच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तो पाहता येईल. ‘जीउस’ असे या श्वानाचे नाव आहे. जीउस हा ग्रेटडेन प्रजातीचा श्वान आहे. ही प्रजाती विशाल आकारासाठी ओळखली जाते. जीउसची उंची 3 फूट 5.18 इंच आहे.

टेक्सासच्या ब्रिटनी डेव्हिसने बालपणापासून ग्रेटडेन पाळण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या भावाने ब्रिटनीला जीउस भेट म्हणून दिला होता. गिनीज बुक रेकॉर्डने इन्स्टाग्राम अकाऊंटवर जीउसचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो लांब उडी मारताना दिसत आहे. तो इतर श्वानांपेक्षा वेगळा असला तरी तो सर्वांसोबत मिळून मिसळून राहत असल्याचे ब्रिटनी यांचे म्हणणे आहे. त्याचा आहारही खूपच अधिक आहे. या प्रजातीचा श्वान पाळायचा असेल तर तुम्हाला आर्थिकदृष्टय़ाही तयार राहावे लागणार आहे. ग्रेटडेन प्रजातीच्या श्वानांचा आहार खूप अधिक असतो, असे ब्रिटनीने सांगितले.