
हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट आई झाली आहे. बबिताने मुलाला जन्म दिला असून बाळाचा पहिला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत तिने एक छानसा संदेशही लिहिला आहे. ‘आमच्या मुलाला भेटा. स्वप्नावर विश्वास ठेवा, ते पूर्ण होतात. आमचे पूर्ण झाले आहे, असा संदेश बबिताने लिहिला आहे.
बबिता फोगाट हिने भारत केसरी विवेक सुहाग याच्याशी 2019 मध्ये लग्न केले. लग्नासाठी विवेक फक्त 21 लोकांचे वऱ्हाड घेऊन पोहोचला होता. हुंडा न घेता हे लग्न संपन्न झाले होते. तसेच बँड-बाजा आणि डिजेही न लावता साधेपणाने हे लग्न करण्यात आला होता. लग्नामध्ये त्यांनी अष्टपदी घेतली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी तिने चाहत्यांना गोड बातमी दिला आहे.
“Meet our little SONshine.”
“Believe in dreams; they do come true. Ours came dressed in blue!”#mother #love #care pic.twitter.com/66CE8b43tx
— Babita Phogat (@BabitaPhogat) January 11, 2021
बबिताने राष्ट्रीत, आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये तिने सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले आहे. तसेच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकावर तिने मोहोर उमटवली आहे. देशासाठी केलेल्या दमदार कामगिरीसाठी तिला मानाचा अर्जुन पुरस्कारही देण्यात आला आहे.




























































