कुस्ती महासंघाविरोधात देशभरातील कुस्तीपटू एकवटले, जंतर मंतरवरील आंदोलनात पुनिया, फोगट,मलिक यांचा सहभाग

देशभरातील नामवंत कुस्तीपटू दिल्तीली जंतर मंतर इथे आंदोलनाला बसले आहेत. या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांचा समावेश आहे. कुस्ती महासंघाविरोधात या कुस्तीपटूंनी हे आंदोलन पुकारले आहे. या कुस्तीपटूंनी महासंघावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मनमानी कारभार करत महासंघाचे पदाधिकारी कुस्तीपटूंना त्रास देत असल्याचं या सगळ्या कुस्तीपटूंचे म्हणणे आहे.