पराभवामुळे महिला कुस्तीपटूची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘दंगल गर्ल’ गीता व बबिता फोगाट यांची मामेबहीण रितिकाने कुस्तीत झालेल्या पराभवामुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. 17 वर्षीय रितिकाने सब ज्युनियर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील 53 किलो गटात भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिचा एक गुणाने पराभव झाला. या पराभवानंतर रितिकाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

गीता व बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीमध्ये कारकीर्द घडविण्याचे ठरवले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने भाग घेता होता. ही स्पर्धा 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झाली होती. या स्पर्धेतील जेतेपदाच्या लढतीतील पराभव तिच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच तिने महाबीर फोगाट यांच्या बलाली गावात 15 मार्चला रात्री 11च्या सुमारास पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. रितिका गेल्या पाच वर्षांपासून महावीर फोगाट यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती. फोगाट बहिणींपैकी असलेल्या रितू फोगाटने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून रितिकाच्या आत्महत्येची माहिती दिली.