झेवियर्सचा ‘जानफेस्ट’ 28 जानेवारीपासून!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल दोन वर्षांच्या गॅपनंतर सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा इंडियन म्युझिक ग्रुप आपला शास्त्राrय संगीताचा ‘जानफेस्ट’ हा उत्सव घेऊन येत आहे. 28 व 29 जानेवारी रोजी महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘स्ट्रिंग्स अटॅच्ड’ हे विद्वान आर. कुमारेश आणि डॉ. जयंती कुमारेश यांचे सादरीकरण आणि पंडित आनंद भाटे यांचे गायन होईल. पं. राहुल शर्मा यांच्या संतूरवादनाने पहिल्या दिवसाची स्वरमय सांगता होईल. दुसऱया दिवशी उस्ताद तौफिक कुरेशी, सारंग कुलकर्णी, शिखरानंद कुरेशी आणि काwशिकी जोगळेकर यांच्या ‘सूर्या’ या वाद्यवृंदाचे सादरीकरण होईल. त्यानंतर पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे गायन होईल. अंतिम सत्रात उस्ताद शुजाअत खाँ यांच्या सतारवादनाने महाअंतिम सोहळा पार पडेल.