
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वृत्तवाहिन्यांनी अँकर्सला घराघरात पोहोचवलं तर अनेक अँकर्स हे वृत्तवाहिन्यांचे चेहरे बनले आहेत. असे असताना आता एक असा अँकर आला हे जो एकटा न थकता, कोणत्याही अडथळ्याशिवाय जगभरातील भाषांमधून अखंड वृत्त वाचन करू शकतो. वाचून थोडे चक्रावले असाल ना! पण हे खरं आहे. तंत्रज्ञानच्या स्पर्धेत सध्या आघाडीवर असणाऱ्या चीनने हे तंत्र विकसित केलं आहे. मात्र या तंत्रज्ञानामुळे असंख्य अँकर्सच्या नोकऱ्या धोक्यात आले आहे.
हा अँकर म्हणजे कुणी व्यक्ती नाही किंवा रोबोट देखील नाही. तर चीनने तयार केलेला हा पहिला आर्टिर्फिशयल इंटेलिजन्स बेस्ड न्यूज अँकर तयार केला आहे. चीनची वृत्तसंस्था झिन्हुआ (Xinhua)ने चीनचे सर्च इंजिन कंपनी सोगूसोबत पार्टनरशिपमध्ये हा प्रोग्राम तयार केला आहे. हा AI न्यूज अँकर वृत्त व्यवस्थित वाचू शकतो आणि माणसांप्रमाणे बोलतो.
Xinhua AI anchor, launched on Wednesday, starts presenting news reports from Thursday. In this program, he takes you to have a look at what a Panama official and the Chinese businessman Jack Ma say about the ongoing #CIIE. pic.twitter.com/OZkRQtv1sQ
— China Xinhua News (@XHNews) November 8, 2018
रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम खरेदी करण्यास वृत्तवाहिन्यांच्या कंपन्या उत्सुक असतील. कारण 24 तास हा सतत कार्यरत असतो. विशेष म्हणजे त्याला व्हर्च्युअल ब्रेकिंग न्यूज तात्काळ वाचू शकतो. विविध चित्रं आणि मानवी आवाज यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारावर एकत्र करून अगदी योग्य असे भाव देखील तो व्यक्त करताना दिसतो. त्यामुळे अँकर्सवर होणारा वृत्तवाहिन्यांचा खर्च कमी होईल, असा दावा करण्या येत आहे. त्यामुळेच अँकर्सच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचं आता म्हटलं जात आहे.
सध्या हा अँकर इंग्रजी आणि मॅन्डेरिन या दोनच भाषांसाठी तयार करण्यात आला आहे. लवकरच जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये तसा प्रोग्राम तयार करून हा अँकर आणला जाईल. सध्या झिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या इंटरनेट आणि मोबाईल प्लॅटफॉर्मवर या दोन भाषेत हा अँकर दिसेल.
बीबीसीच्या वृत्तानुसार हा अँकर हुबेहुब मानवासारखा दिसतो. मात्र असे असले तरी या बातम्या लोक फार काळ पाहू शकणार नाही, कारण त्यामध्ये कृत्रिमता वाटते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आवाजातील चढउतार अशा गोष्टी हा प्रोग्रामर करू शकत नाही.


























































